खारघर ः रामप्रहर वृत्त
भाजप महिला मोर्चा खारघरच्या वतीने येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत तसेच महिला मोर्चा खारघर अध्यक्ष साधना पवार यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 29) महिला कार्यकर्त्यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले.
आपले आमदार हे विकासपुरुष आहेत. सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले आमदार आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे, अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचा गौरव गोव्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी या वेळी केला तसेच अगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद त्यांच्या पाठीशी लावून त्यांना विजयी करा आणि तुमच्यावर जी जबाबदारी सोपावली आहे ती ओळखून काम करा, असे आवाहन नियुक्ती केलेल्या पदाधिकार्यांना केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना शुभेच्छा देत भाजपने केलेली विकासकामे आणि राबविलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवा तसेच प्रयत्न व अभ्यास करून प्रत्येक समस्या सोडवा, असे सूचित केले.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस अमरीश मोकल, ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, भाजप खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक शामला सुरेश, सरचिटणीस कांचन बिर्ला, उपाध्यक्ष मधुमिता जेना, अंकिता वारंग, चिटणीस मीनाक्षी अंतवाल, सीमा खडसे, दुर्गादेवी, कोषाध्यक्ष जया नायर, सदस्य पुष्पा राजपुरोहित, प्रभाग 6च्या अध्यक्ष नेहा यादव, माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस अनिल खोपडे, शहर चिटणीस तुकाराम कंटाळे, ब्रिजमोहन, युवा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, आदित्य हदगे, दीपक ठाकूर, हार्दिक पटेल, प्रथम पाटील, यश पवार, ध्रुव गजरा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी महिला मोर्चा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीसपदी भाग्यश्री खरपूरीया, ओबीसी सेल सोशल मीडिया सहसंयोजकपदी स्नेहल बोदाई, महिला मोर्चा उपाध्यक्षपदी सारिका जाधव, सदस्यपदी श्रद्धा भट, प्रभाग 5 अध्यक्षपदी सीमा खडकर, उपाध्यक्षपदी माया सिंग, धनश्री भोईर, गायत्री दुबे, ममता आचरेकर, चिटणीसपदी भारती बांदेकर, मालिनी शिंदे, विद्या येवले, नीता बेडेकर, प्रभाग 3 उपाध्यक्षपदी नूतन डांगळे, सुनीता देशमुख, मनीषा तळवडकर, चिटणीसपदी सुजाता पवार, सुनंदा देसाई, सुनिता बचूलकर, प्रभाग 4 उपाध्यक्षपदी नंदा पानसरे, सोमा बिस्वास, गायत्री महापात्रा, जुमा चक्रवर्ती, चिटणीसपदी नूतन सिंग, शारदा भोसले, संध्या पुजारी, स्मिता पटेल, आशा पवार, रजनी शर्मा, सदस्य म्हणून सीमा मजुमदार, ज्योती कासार, शामल भोसले, सुनिता यादव, प्रभाग 6 उपाध्यक्षपदी आशा मोरे, छाया हरेल, प्रिया शर्मा, प्रतीक्षा माळी, प्रिया राजकुमार, चिटणीसपदी विमल कांबळे, निर्मला उभारे, रूपी जयस्वाल, नीतू ओझा, लूकमणी कलिता यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …