


पनवेल : नवीन वर्षानिमित्त ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
योगिता पारधी यांना शुभेच्छा

पाले खुर्द (ता. पनवेल) : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या योगिता पारधी यांना पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्य रत्नप्रभा घरत, तनुजा टेंबे, राज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
देवकीबाई कातकरी यांचे अभिनंदन

पनवेल : पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी यांचे जिल्हा परिषद शाळांचे केंद्र प्रमुख व शिक्षकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत.
रिपाइं युतीच्या रूचिता लोंढे यांची प्रचारात आघाडी

पनवेल : महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप, रिपाइं युतीच्या रूचिता लोंढे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, युतीचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रचारात सहभागी होत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या प्रचारदौर्यात भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, संतोष शेट्टी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, तसेच संजय जैन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, शहराध्यक्ष चिन्मय समेळ, प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, युवा नेते प्रशांत झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुकृती श्रीवास्तव हिचे अभिनंदन

पनवेल : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) कॉर्पोरेट कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्याशी सलग्न असलेल्या संस्थेने आयोजित केलेल्या ऑल इंडिया करंट अर्फेअर आणि जनरल नॉलेज स्पर्धेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सुकृती श्रीवास्तव (इयत्ता बारावी) राज्यात प्रथम, तर देशात 14वी आली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व अन्य मान्यवर सोबत होते.