Breaking News

कष्टाला पर्याय नाही ः आमदार प्रशांत ठाकूर

एकविरा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, मेहनत घ्यावी, मन लावून अभ्यास करावा, कष्टाला पर्याय नाही, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहोळ्यात ते बोलत होते. एकविरा युवक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

पनवेल तक्का येथील एकविरा युवक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही परिसरातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी आयोजित केला होता. या सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पनवेलमधील तक्का येथे एकविरा युवक मित्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 28वा गणेशोत्सव साजरा होत आहे. या मंडळामार्फत दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत तक्का गावातील मराठी व उर्दू शाळेतील पहिली ते सातवीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच तक्का गाव व कॉलनी परिसरातील दहावी बारावी व पदवी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास एकविरा युवक मित्र मंडळाचे संस्थापक तथा भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती

ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, ज्येष्ठ नेते मनोहर मुंबईकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, जगन्नाथ बहिरा, सहमद मुकादम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply