Breaking News

पनवेलमधील मोहरम आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे असंख्य कार्यक्रम परंपरागत असतात. पनवेल शहरात असाच एक कार्यक्रम जोपासला जातो. पनवेल येथील अस्ताना ग्रुपतर्फे 19 वर्षांपासून मोहरमनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांमध्ये सर्वधर्म समभाव मानणारा अस्ताना ग्रुप उरण नाका पनवेल येथे बारा इमाम यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने भक्तिभावाने उपस्थित असतात. ही परंपरा मागील 19 वर्षापासून ज्येष्ठ समाजसेविका रिजवाना दीदी भक्तिभावाने करत आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणावर  येणार्‍या प्रत्येक भाविकांसाठी महाप्रसाद व सरबत वाटप केले जाते. बाराव्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाभोजनाची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सर्व धर्मातील सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रेटी असे असंख्य लोक दर्शनासाठी येतात.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply