खारघर : वार्ताहर : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, तसेच बाहेरील रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर व प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले आहेत.खारघर वसाहत सेक्टर 13 मधील राहणार्या रहिवाशींच्या मागणीनुसार या परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी सातत्याने सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे येथील नागरी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याबद्दल स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचे जाहीर आभार मानले आहेत.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …