Breaking News

बीसीटी विधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मयमंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या कार्यक्रमाकरीता अनेक सन्माननीय पुरस्कारांनी पुरस्कृत ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक अरुण म्हात्रे हे मुख्य अतिथी म्हणून तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अरुण म्हात्रे यांचे गुंजते मराठी, गर्जते मराठी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाजलेली मराठी मालिका उंच माझा झोका या मालिकेचे अरुण म्हात्रे यांनी शब्दबध्द केलेले शीर्षकगीत दाखविण्यात आले. याच गाण्याकरीता अरुण म्हात्रे यांना झी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना मातृभाषेचे महत्व नमूद केले आणि प्रमुख पाहुणे अरुण म्हात्रे यांची ओळख करून दिली.  विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मयमंडळात मोठ्या प्रमाणात भाग घेवून, व्यक्तिमत्व विकासासाठी जे व्यासपीठ मिळाले आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

प्रमुख अतिथी अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत प्रेरणादायक शब्दात विधी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगतानाच मराठी भाषा टिकून राहण्यासाठी तरुणपिढीने मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्याची गरज आहे, असे सांगितले. जीवनात त्यांना जे काही यश लाभलेत्याच सर्व श्रेय त्यांनी मराठी भाषेला दिले. त्यासोबतच अरुण म्हात्रे यांनी त्यांचा बहारदार कवितांचा कार्यक्रम सादर केला.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात अरुण म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन सहाय्यक प्राध्यापिका संघप्रीया शेरे आणि आभार प्रदर्शन अंतिम वर्षांची विद्यार्थिनी अक्षता ठाकूर हिने केले. हा कार्यक्रम झुम या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आणि त्याचबरोबर युट्यूबवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply