Breaking News

पारंगखार ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल

अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले स्वागत

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघातील पारंगखार ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 9) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. पारंगखार येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राजकुमार ओळांबे, लखन घाग, विजय घाग, बाळकृष्ण ओळांबे, पांडुरंग पाटील, कमळाकर ओळांबे, मुकुंद गायकर, हरिश्चंद्र गावडे, हरिश्चंद्र ओळांबे, धर्मा वाडकर, रामनाथ म्हात्रे, प्रवीण गायकर, रघुनाथ म्हात्रे, राज पाटील, रामचंद्र घाणेकर, गंगाराम घाणेकर, अल्पेश गायकर, मोतीराम गायकर, राहुल ओळांबे, धर्मेंद्र ओळांबे, कल्पेश गायकर, धर्मा भोईर, दत्ताराम ओळांबे आदी ग्रामस्थांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये  प्रवेश केला. भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, भाजप युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष सुदर्शन गावडे, अमित पाटील, सागर पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित  होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply