Breaking News

खारघरमध्ये सम विषम पार्किंग व्यवस्था

खारघर : प्रतिनिधी

खारघर शहरातील सेक्टर 6 मधील सावन हायनेस सोसायटी समोरील रस्त्यावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सम विषम नियमांची अंमलबजावणी नियमावली 8 एप्रिलपासून लागु केली आहे. त्याठिकाणच्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी, तसेच वाहतुक करताना निर्माण होणार्‍या अडथळ्यामुळे नवी मुंबई वाहतुकीचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी यासंदर्भात अधिसूचना पारित केली आहे.

खारघर सेक्टर 6 सावन हायनेस सोसायटी प्लॉट नंबर 6 ए या सोसायटीच्या येणार्‍या दोन्ही बाजुस शहा अल्पाईन व शहा आर्केड या रहिवासी इमारती असून या इमारतीच्या आतमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने सदर सोसायटीत रहिवासी सोसायटीच्या समोरील रस्त्यावर वाहन पार्क करीत आहेत. यामुळे शाळेच्या बसेस, कचरा उचलणार्‍या गाड्या, त्याठिकाणच्या रहिवाशांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे. आणीबाणीच्या वेळेला रुग्णवाहिका, अग्निशामकची वाहने यांनादेखील अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी याठिकाणचा रस्ता सम विषम पार्किंग करीत घोषित केला आहे.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply