Breaking News

जि.प.चा 72 कोटींचा शिलकी महसूली अर्थसंकल्प

अलिबाग : प्रतिनिधी

 रायगड जिल्हा परिषदेचा  2019 – 2020 सालचा 72 कोटी 34 लाख 28 हजारा 214 रूपयांचा शिलकी  महसूली अर्थसंकल्प   रागड जल्हा परिषदेचे  अर्थ व बांधकाम समितीचे सभापती  अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी (दि.28) सादर केला तो  मंजूर करण्यात आला. या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाचा समावेश करण्यात आला आहे.  या अर्थसंकल्पात बांधकाम विभागाला झुकते माप देण्यात आले असून या विभागासाठी सर्वाधिक 22 कोटी 71 लाख 70 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज रायगड जिल्हा परिषदेची सभा कै. ना. ना. पाटील सभागृहात झाली त्यात  अ‍ॅड. आस्वाद पाटलील यंनी अर्थसंकल्प सादर केला.  2019 – 2020 सालचा मुळ महसूली  अर्थसंकल्प 71 कोटी 76 लाख रूपयांचा आहे. अखेरची शिल्लक 5 कोटी 82 लाख 8 हजार 214 रूपये आहे. असा महसूली 72 कोटी 34 लाख 28 हजार 214 रूपये व भांडवली 65 कोटी 70 लाख रूपये असा एकूण 138 कोटी 42 लाख 8 हजार 214 रूपयांचा  अर्थ संकल्प  आहे. प्रशासन 92 लाख 50 हजार, सामान्य प्रशासान 74 लाख 80 हजार, शिक्षण  2 कोटी 25 लाख, बांधकाम 22 कोटी 71 खाख 70 हजार, पाठबंधारे  1 कोटी, सार्वजनिक आरोग्य  1 कोटी 75 लाख, सार्वजनिक आरोग्य देखभाल दुरूस्ती 10 कोटी 40 लाख, कृषि विभाग 1 कोटी,  समाज कल्याण 9 कोटी 40 लाख, अपंक कल्याण 2 कोटी 35 लाख, महिला व बालकल्याण 4 कोटी 70 लाख अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्येकरण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषदेचा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. या अर्थसंकल्पात शालेय क्रीडा स्पर्धांसाठी तरतूद असावी, चांगले खेळाडू तयार करण्यासाठी अशी तरतूद आवश्यक आहे.
-अमित जाधव, प्रतोद भाजपा राजिप

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply