मुंबई : प्रतिनिधी
भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारी (दि. 28) संस्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण वाढू नये आणि राज्यात अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध व्हावे या कारणामुळे अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.