Breaking News

डॉ. नीता पाटील फाऊंडेशनच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम

मोहोपाडा ः वार्ताहर

डॉ. नीता पाटील फाऊंडेशनची सभा मोठ्या उत्साहात झाली. या सभेला रायगड मुंबईतील 75  व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. सभेला राजू टपाल आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे  उपस्थित होते. फोरमच्या अध्यक्ष डॉ. नीता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर आणि शिवश्री प्रभाकर भोईर यांनी या सभेचे सुंदर आयोजन केले. डॉ. नीता पाटील फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने ग्राहक संरक्षण जागृती फोरम, अनिका महिला सक्षमीकरण कार्यक्रम, सर्व भाषिक शाळा- महाविद्यालयीन पालक संघ आणि सांस्कृतिक विभागात नाटक, एकांकिका स्क्रिप्ट पूजन या चार लोकाभिमुख नव्या सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या सर्व उपक्रमांबद्दलची संपूर्ण माहिती डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी उपस्थितांना दिली. या उपक्रमांमध्ये सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले. फाऊंडेशनच्या वतीने घेतल्या गेलेल्या राखी मेकिंग स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण, फोरमच्या स्थापनेपासून अगदी जलद गतीने एक लाखांचा व्यावसायिक टप्पा पार करणारे फोरमचे व्यावसायिक सदस्य दिलीप राठोड आणि भूषण शाक्यवीर यांचा प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एक मिनिटांचे बिजनेस इन्ट्रोडक्शनच्या विजेतेपदाचे मानकरी आनंद तेंडुलकर ठरले. या वेळी एक मिनिट परिचय विजेत्याची निवड  करण्यात आली. फाऊंडेशनचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष प्रभाकर भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply