नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयाचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशिष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी डॉ. परेश कटारिया लिखित पंचकर्म या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त शिवानी पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे सर्व अध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. आशिष म्हात्रे यांनी आपले प्रेरणास्थान डॉ. विजय पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर हे पुस्तक आयुर्वेदाच्या नवीन पिढीला आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्राचे ज्ञान घेण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी मिलेनियम हर्बलच्याच्या वतीने अस्थमा या विषयावरील रिसर्च पूर्ण झाल्याबद्दल कंपनीच्या वतीने डॉ. आशिष म्हात्रे यांना प्रमाणित करण्यात आले. याशिवाय मधुमेहावरील मधुमेहजन्य नाडीप्रतानशोध (न्युरोपॅथी) नावाच्या त्रासदायक उपद्रवावर डॉ. आशिष म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयामध्ये रिसर्च सुरू आहे.