पनवेल ः शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा बुधवारी (दि. 25) सकाळी 10.45 वाजता महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल येथे होणार आहे.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य सदस्य अरुणशेठ भगत, महेंद्र घरत आदी उपस्थित राहणार आहेत.