पनवेल : प्रतिनिधी
मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती केल्यानंतर आता नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एकात्मिक औद्योगिक वसाहत म्हणजे नवनगर निर्मिती करण्याचे काम प्रगतिपथावर असून, या प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्राची मोजणी आणि सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती नवनगर विकास प्राधीकरणचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
नवनगरच्या अधिसूचित क्षेत्राच्या हद्दीची माहिती देणारा नकाशा नागरिकांना पाहाण्यासाठी तो अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या कालावाधीसाठी कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक नवी मुंबई, जिल्हाधिकारी रायगड कार्यालय अलिबाग, नगररचना विभागाचे सहसंचालक बेलापूर, सहाय्यक संचालक अलिबाग यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता. रोहा तालुक्यातील चणेरे ग्रामस्थसेवा मंडळ (स्थानिक) मुंबईचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांना पाठवलेल्या 13 मे 2020च्या पत्रात नवनगर विकास प्राधीकरणचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी अनिल पवार यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड, अलिबाग, रोहा आणि श्रीवर्धन अशा चार तालुक्यांतील क्षेत्र एकात्मिक औद्योगिक वसाहत प्रकल्पासाठी अधिसूचित करण्यात आले असून, या क्षेत्राची मोजणी आणि सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …