पनवेल ः बातमीदार
पनवेल तालुक्यात प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाची पायभरणी सुरू असून येथील आदिवासी मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. दररोजच्या जगण्यात अडथळे निर्माण करणार्या आदिवासी वाड्यांवरील प्रश्न सोडविण्याची मागणी आदिवासी समन्वय समितीचे संजय चौधरी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना निवेदनातून केली आहे. तालुक्यातील 55 आदिवासी पाड्यांमध्ये अनेक मूलभूत समस्या प्रलंबित आहेत. पाड्यांमध्ये जाणारे कच्चे रस्ते, वारंवार होणारी पाणीटंचाई, जातीचा दाखला काढण्यासाठी अशिक्षित आदिवासींना होणारा त्रास, आदिवासींच्या पडिक, दफनभूमींकडे जाणार्या रस्त्यांचा अभाव, असे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.