खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त भागाची पाहणी करून खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी तलाठी आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या.
आगामी पावसाळ्यातील आपत्तीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या यादीमधील बोरगांव ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी (बोरगाव खुर्द) आणि पोखरवाडी बंधारा येथे खालापूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली. तेथील स्थानिक लोकांबरोबर पावसाळ्याच्या कालावधीत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी जागा, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपलब्ध होणार्या सोयी सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. या वेळी चौक पोलीस दुरक्षेत्रचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक युवराज सुर्यवंशी तसेच संबंधीत पोलीस पाटील, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.