Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे  चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वयंसेवकांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सत्यजित कांबळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीबद्दल माहिती दिली. या वेळी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्गही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

वावंजे विद्यालयात कर्मवीर जयंती

पनवेल ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 22) वावंजेतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे चेअरमन यांच्या हस्ते पूजन करुन प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्यु. कॉलेजचे चेअरमन पंकज पाटील, व्हा. चेअरमन अब्दुलहाई शेख, स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक कृत्य

पनवेल : अल्पवयीन मुलीस अनैतिक कृत्य करण्यासाठी कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून आणणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलीस पोलिसांनी वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली आहे. 19 वर्षीय वाशी येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलाने 17 वर्षीय पीडित मुलीस करंजाडेे पनवेल येथून पटणा बिहारच्या दिशेने रेल्वेने अनैसर्गिक कृत्यासाठी अपहरण करून घेऊन जाताना जळगाव रेल्वेस्टेशन येथे पोलिसांना मिळाल्याने या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

पनवेल : पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, केस काळे वाढलेले, मिशी व दाढी वाढलेली, मिशी व दाढीचे केस काळे-पांढरे असून उजवा हात खुब्यात वाकलेला आहे. तसेच त्याच्या उजव्या पायास दोन बोटे आहेत. डाव्या हाताच्या मनगटावर जुन्या जखमेचा व्रण आहे. अंगात राखाडी रंगाचे टी शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Check Also

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तपरदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply