पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे समाजाचे कार्यालय (तात्पुरत्या स्वरूपाचे) समाजाची वास्तू नवीन पनवेलमधील सेक्टर 1/एस. प्लॉट नं. 136बी येथे बसवून सत्यनारायणाची महापुजा आणि महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संजय खरोटे आणि समाज बांधवांच्या साक्षीने समाजाचे कार्यालयाचे (कॅबिन) उद्घाटन करण्यात आले. या वेळी मंडळाचे सचिव हेमकांत सोनार, कोषाध्यक्ष विजय भामरे, कार्याध्यक्ष धनराज विसपुते, महिला मंडळ अध्यक्षा संगिता विसपुते, महिला मंडळ सचिव कल्पना सोनार, युवा सचिव, तुषार भामरे, उपाध्यक्ष डॉ. सतीश विसपुते, प्रवीण भामरे, डी. एच. विसपुते, पुंजाराम थोरात, संस्थापक सदस्य जी. एल. विसपुते, नंदकुमार नाशिककर, ज्येष्ठ सभासद सी. डी. मोरे, दीपक विसपुते, सहसचिव मनोज सोनार, दीपक वाघ, सहकोषाध्यक्ष पंकज पोतदार आदी उपस्थित होते. मकरसंक्रांतचे औचित्य साधून महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. मकरसंक्रांतींच्या निमित्ताने महिला मंडळाने महिलांना हळदीकुंकू व वाण दिला, या वेळी अध्यक्षा संगिता विसपुते, सचिव कल्पना सोनार, शमिका सोनार, अनिता विभांडिक, सारिका बिरारी, डॉ. दिपाली विसपुते आदी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अल्पोपहार व्यवस्था पुंजाराम थोरात, मंडप डेकोरेशन दिनेश बाविस्कर, तिर्थप्रसाद पंकज पोतदार, चहा आणि पाणी व्यवस्था शमिका सोनार, फोटोग्राफी तुषार भामरे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख श्रीनिवास पोतदार, विजय वानखेडे, उदय वाघ, एम. आर. चव्हाण, डॉ. भामरे, श्री. नेरकर, उदय विभांडिक, राजेश विभांडिक आदींनी सहकार्य केले.