
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रयत शिक्षण संस्था साताराचे सहसचिव विजयसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जयंतीचा कार्यक्रम झाला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रितिका दास, श्री. फडतरे, श्री. कारंड, नगरसेवक विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव विजयसिंह सावंत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.