नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठीचे होणार नियोजन
माणगाव : प्रतिनिधी
भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक व विधानसभा प्रभारी राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा व माणगाव या ठिकाणी महासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता माणगाव येथील कुणबी भवन हॉलमध्ये कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक बूथवर आपल्या पक्षाला किती मतदान होणार आहे याचाही आढावा घेण्यात येणार आहे. भाजप राज्य परिषद सदस्य संजय कोनकर, मनोज भागवत, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे, म्हसळा तालुकाध्यक्ष शैलेश पटेल, तळा तालुकाध्यक्ष कैलास पायगुडे, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, तुकाराम पाटील, योगेश सुळे आशुतोष पाटील, आत्माराम शेलार, संजय लोटणकर, प्रकाश रायकर, मंगेश शिगवण, राजेंद्र म्हामूणकर, रमेश लोखंडे, आनंद लाड, अॅड. परेश जाधव, सरोज म्हशिलकर, मेघना ओक, प्राजक्ता शुक्ला, हेमा मानकर, जयश्री भांड, यशोधरा गोडबोले, मनोज गोगटे, दिनेश चोगले, सुरेंद्र साळी, नितिन दसवते, उद्धव जाधव, मंगेश म्हशिलकर, चिन्मय मोने, विलास गालांडे, महेश पाटील, नरेश कोकरे, आरती मांजरेकर, धनश्री बापट, मीना टिंगरे, मेघा धुमाळ, मनीषा श्रीवर्धनकर, शैलेश खापणकर, मंगेश मुंडे, दिनेश पिळणेकर, राजू मुंडे, शैलेश रावकर, नाना महाळे, शरद चव्हाण, अॅड. जयदीप तांबुटकर, प्रशांत सकपाळ, राकेश पवार, सुदर्शन गावडे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस जिल्हा, तालुका, मंडळ व मोर्चा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.