पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 164 कोटींची करवसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचार्यांनी दमदार कामगिरी करून मोठा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
गेल्या वर्षभरापासून नागरिकांच्या मालमत्ता कराविषयीच्या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी चारही नोडमध्ये महापालिकेने सुनावण्या घेतल्या तसेच नागरिकांच्या मालमत्ता कर बिलामधील चूक दुरूस्ती मालमत्ता विभाग तात्काळ करून देत होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनूसार सिडको क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कराच्या शास्तीमध्येदेखील महापालिकेने सुरुवातीस 100 टक्के त्यानंतर अनुक्रमे 75, 50, 25 टक्के सवलत दिली. 1 जानेवारीनंतर मात्र महापालिकेने थोडे कडक धोरण स्वीकारून 100 टक्के शास्ती फी आकारली. यामध्येही ऑनलाईन पद्धतीने कर भरणार्या, सौरऊर्जेचा वापर करणार्या सोसायटीधारकांना, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्या सोसायटीमधील मालमत्ताधारकांना दोन टक्के सवलत देण्यात आली. कचरा वर्गीकरण व कचर्याची स्वतः विल्हेवाट लावणार्या सोसायट्यांमधील मालमत्ताधारकांना ेखील मालमत्ता करामध्ये दोन टक्के सवलत दिली गेली.
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी पीएमसी टॅक्स अॅप व क्युआर कोड विकसित केला आहे. याचबरोबर www.panvelmc.org या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सोय केली. या वर्षी क्यूआर कोडच्या माध्यमातून मालमत्ता भरणार्यास नागरिकांनी अधिक पसंती दिल्याचे पहावयास मिळाले.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …