Breaking News

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दोन लाख 57 हजार 263 मतदार बजावणार हक्क

श्रीवर्धन : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील एका लाख 25 हजार 965 पुरुष व एक लाख 31 हजार 298 महिला मिळून एकूण दोन लाख 57 हजार 263 मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये श्रीवर्धन, म्हसळा व तळा हे तीन तालुके पूर्णपणे आणि माणगाव व रोहा या दोन तालुक्यांचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या विधानसभा मतदारसंघातील श्रीवर्धन तालुक्यात 90, म्हसळा तालुक्यात 70, तळा तालुक्यात 55,  माणगाव तालुक्यात  74 आणि रोहा तालुक्यात 57 अशी एकूण  346 मतदान केंद्रे आहेत.

2014पूर्वी श्रीवर्धन मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख  40 हजार 324 होती. त्यात 16 हजार 939ने वाढ होऊन 31 ऑगस्ट रोजी या मतदारसंघाची मतदारसंख्या दोन लाख 57 हजार 263 इतकी झाली आहे.

श्रीवर्धन मतदारसंघातील मतदारांची संख्या            

     महिला          पुरुष      एकूण

श्रीवर्धन :       34053         31285   65338

म्हसळा  :      25905         23798   49703 

तळा     :      19427         18764         38191

माणगाव  :      30123         29578         59701

रोहा      :     21790         22440         44230

  विधानसभा निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी विधानसभा  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दि. 4 ऑक्टोबर,

नामनिर्देशन पत्रांची छाननी  दि. 5 ऑक्टोबर,

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 7 ऑक्टोबर, मतदान दि. 21 ऑक्टोबर, मतमोजणी दि. 24 ऑक्टोबर.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply