नागोठणे : प्रतिनिधी
कोणतेही आंदोलन न करता, गाड्या बंद न करता संबंधित शासकीय कार्यालयाना भेट देऊन, अधिकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर अखेर मिनिडोअर चालक मालकांच्या मागण्यांना मुख्यंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्यातील चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली.
रायगड जिल्हातील अनेक सुशिक्षित बेकार तरुण हे तीन चाकी सहाआसनी विक्रम मिनिडोअर रिक्षा चालक आपल्या कुटुंबाची उपजीविका गेली 25 वर्षापूर्वीपासून भागवीत आहेत. 2019-20 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने दोन वर्ष गाड्या बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशातच 2019 मध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने त्यांना विचारात न घेता नवीन तीन चाकी सहा आसनी विक्रम मिनिडोअर पासिंग बंद करून त्या ऐवजी चार चाकी सहा आसनी इको गाडीला परवानगी दिली. ही गाडी ग्रामीण भागातील गोरगरीब रिक्षा चालकांना मालकांना तसेच प्रवाशांना परवडणारी नसल्याने तिला पर्यायी म्हणून गड- कंपनीची पेट्रोल सी. एन. जी तथा डिझेल गाडी पासिंग होण्यास परवानगी मिळावी, कोरोना काळातील दोन वर्ष पासिंग सरसकट मिळावी तसेच 2019 पासून आजपर्यंत आलेल्या व या पुढे येणार्या इको 6+1 गाडयांना मान्यता मिळावी अशा अनेक प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांसाठी ग्रामीण रायगड जिल्हा सहा आसनी चालक मालक संघटनेने पाठपुरावा केला.
अध्यक्ष प्रफुल भगत व त्यांच्या सहकार्यांनी कोणतेही आंदोलन न करता, गाड्या बंद न करता संबंधित शासकीय कार्यालयाना भेट देऊन, अधिकार्यांसोबत चर्चा करून, लेखी निवेदन देऊन पाठपुराव्याच्या दीर्घ प्रवासानंतर श्री. गणेश विक्रम चालक मालक संघटना नागोठणे, रोहा, कोलाड, चनेरा, अलिबाग, माणगाव, इंदापूर, तला, पाली, निजामपूर, म्हसळा, श्रीवर्धन, लोनरे, महाड, पोलादपूर, पोयनाड, पेझारी, वडखळ, पेण, आमटेम इत्यादी संघटनांच्या सहकार्याने अध्यक्ष प्रफुल भगत, जयराम खाडे, डॅनी महाराज, विश्वास बागूल, चेतन परभळकर, मयूर दळवी, विशाल म्हात्रे, सचिन धाडवे, प्रदीप पवार, शंकर वाणी, निसार जंगमे, स्वप्नील शिगवण, दिपक गावंड, महेंद्र घोसाळकर, सागर जाधव, इत्यादिंच्या अथक प्रयत्नांनी आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर, पालकमंत्री उदय सामंत, अभय देशपांडे यांच्या सहकार्याने 17 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करून रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्या अखेर मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे रिक्षा चालक मालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …