Breaking News

शेकापला आणखी एक दणका

आपटा दाभोलवाडीतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा दाभोलवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शेकापला आणखी एक दणका मिळाला आहे.

मोहोपाडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, चांभार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य प्रवीण जांभळे, वावेघर ग्रामपंचायत सदस्य विलास माळी आदी उपस्थित होते.

या वेळी काळूराम वाघे, अनंत वाघे, बारकू वाघे, अंकुश वाघे, किशोर वाघे, जयराम वाघे, एकनाथ वाघे, काशिनाथ वाघे, गवर्‍या वाघे, सदन्या वाघे, गणू वाघे, सचिन वाघे, उमेश वाघे, गोरख वाघे, कृष्णा वाघे, शंकर वाघे, बाळकृष्ण वाघे, गणपत वाघे, दीपेश वाघे, हरेश वाघे, सुनील वाघे, राजेश वाघे, संजय वाघे, साईनाथ वाघे, अनिल वाघे, योगेश वाघे, रोहिदास वाघे आदी शेकापच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह ‘कमळ’ हाती घेतले. त्यांचे भाजप नेते महेश बालदी यांनी स्वागत केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply