Breaking News

भाजप भ्रष्टाचारविरोधी पक्ष : आ. प्रशांत ठाकूर

राष्ट्रवादीच्या सुभाष पाटील यांचा पक्षप्रवेश

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार मोडित काढणारा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) बेलवली येथे केले. ते कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते सुभाष पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदारांनी स्वागत केले.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील पळस्पे व कोन पं. स. गण कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी बेलवली येथील श्रीगणेश सभागृहात झाली. या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सदस्य निलेश पाटील, एकनाथ भोपी, अनेश ढवळे, शिल्पा पवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. भाजप हा आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचेही बघावे या पद्धतीने चालणारा पक्ष असल्याचे सांगून गरिबांच्या भल्यासाठी काम करणार्‍या या पक्षाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply