Breaking News

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौर्‍यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे, तसेच पक्षातील कोणत्याही नेत्याला त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षांतर्गत कुरबुरींमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांचेही नाव आल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा, असेही सांगण्यात येत आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply