Breaking News

विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

नाशिक : प्रतिनिधी

शिवपुरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विजेच्या धक्क्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) आणि सिंधुताई शांताराम केदारे (40) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत, तर नंदिनी शांताराम केदारे (23) आणि शुभम शांताराम केदारे (19) अशी गंभीर झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केला. घरांना अडथळा ठरणार्‍या विजेच्या तारा त्वरित हटवाव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी स्थानिकांची आग्रही मागणी आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply