Breaking News

‘अजितदादांचे राजीनामानाट्य म्हणजे एंटरटेन्मेंट’

लातूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या राजीनामानाट्यावर त्यांनी स्वतः खुलासा केला असला, तरी भाजप नेते यावर टीकेची झोड उठवीत आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे पवार कुटुंबात शांतता राहावी म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेला प्रार्थना करू असे सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे फक्त ‘एंटरटेन्मेंट’ असल्याची टीका केली आहे. ते लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे प्रचार दौर्‍यावर असताना माध्यमांशी बोलत होते. 20 दिवसांवर निवडणुका असताना कुठलेही ठोस विषय-मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसजवळ नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी केलेला हा प्रकार असल्याची टीकाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply