Breaking News

राणेंचा बुधवारी भाजपप्रवेश?

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली. नारायण राणे येत्या 2 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही कारणास्तव अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलला गेला. आता अखेर 2 ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता राणे भाजपवासी होणार आहेत. राणेंसोबत त्यांची दोन्ही मुले भाजपत प्रवेश करतील.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply