Breaking News

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तरी हीरक महोत्सवानिमित्त अभिवादन यात्रा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर भावे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेने 160 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेद्वारा संचालित नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सवी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल परिसरात झालेला हा अभिवादन यात्रेचा सोहळा रंगतदार व प्रेक्षणीय ठरला. विद्यालयाचा वाद्यवृंद, आकर्षक चित्ररथ, ज्ञानपालखी, पारंपरिक वेषातील ध्वजपथक, विविध क्रांतिकारक व समाजसेवकांच्या वेषभूषा साकारलेले विद्यार्थी या सर्वांच्या सुरेख संगमाने हा यात्रासोहळा लोकांचे चित्त वेधून घेणारा ठरला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते, तसेच पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन झाले.  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी संस्थेची माहिती सांगितली. त्यानंतर विनायक पात्रुडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अभिवादन यात्रेला प्रारंभ झाला.  पालकवर्गाने ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथक, तसेच वाहतूक नियंत्रक कक्ष व पोलीस अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply