माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अभिवादन
खारघर ः रामप्रहर वृत्त
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनाही वीरमरण आले. या घटनेला शनिवारी 13 वर्षे झाली. मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच त्यांना अभिवादन म्हणून खान्देश विकास फाउंडेशनच्या वतीने खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन खान्देश विकास फाउंडेशनने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शहिदांना अभिवादन केले. या वेळी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील आदी उपस्थित होते.