Breaking News

महायुतीचे उमेदवार, पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज भरणार

पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल करणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. दोन वेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी ज्येष्ठ, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी सकाळी 9 वाजता पदाधिकारी व कार्यकर्ते जमणार असून, त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply