Breaking News

म्हसळ्यात गोविंदाचा पडून दुर्दैवी मृत्यू

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यातील खरसई येथे दहीहंडी उत्सवाला शनिवारी (दि. 24) गालबोट लागले. येथे पाचव्या थरावरून पडून एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्जुन लक्ष्मण खोत (23) असे त्याचे नाव आहे.

अर्जुन खोत हा श्री समर्थ रामदास सेवा मंडळाचा गोविंदा होता. दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. खरसईत पाच वर्षांपूर्वी किशोर खोत या गोविंदाचा हनुमान मंदिरासमोर अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply