Breaking News

सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएसचा प्लास्टिकमुक्त अभियान रॅलीत सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पनवेल महानगरपालिका आयोजित स्वच्छता व प्लास्टिकमुक्ती अभियान रॅलीमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे स्वच्छता अभियान रॅली आयोजित केली होती. त्यामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 156 स्वयंसेवकांनी हा सहभाग नोंदविला. सर्वप्रथम सर्वांनी स्वच्छता, तसेच प्लास्टिक बंदीसाठी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या वेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ उपस्थित होते. त्यांनी सर्व स्वयंसेवकांना ‘स्वच्छता हीच सेवा’ व ‘प्लास्टिकमुक्त पनवेल’ यावर माहिती दिली, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचे पालन करण्यास सांगितले. स्वयंसेवकांसोबत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव व प्रा. सागर खैरनार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, तसेच उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सक्रिय सहभागाबद्दल स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply