Breaking News

भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे अपघाती निधन

महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा आणि नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे गुरुवारी (दि. 3) अपघाती निधन झाले. या अपघातात महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील प्राचीन हॉस्पिटलकडून एचएससी कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर उभ्या असताना स्विफ्ट कारने या दोघींना धडक दिली.      
या अपघाताचे वृत्त कळताच निवडणूक प्रचारात असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, तसेच नगरसेवक व भाजपचे अन्य लोकप्रतिनिधीही तातडीने हजर झाले.
मनमिळावू असलेल्या मुग्धा लोंढे पनवेलमध्ये सुपरिचित होत्या. त्यांचे वडील नंदाजी ओझे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक म्हणून काम पाहिले आहे. लोंढे यांची खानावळही प्रसिद्ध आहे. मुग्धा लोंढे यांच्या पश्चात पती, दोन मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. मुग्धा लोंढे यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply