Breaking News

मोरा गावची एकवीरा देवी

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील उरण नगरपालिका हद्दीतील मोरा कोळीवाडा गावातील डोंगरावर असलेली सर्व कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेली, मोरा गावाची आराध्यदैवत व जागृत देवस्थान असलेल्या  श्री एकविरा देवी होय.   गावाजवळील डोंगरावर वसलेली असून जवळच डोंगरावरील मोठा पाण्याचा झरा (धबधबा) बाराही महिने वाहत असतो, देवीचा महिमा मोठा असल्याने उरण तालुक्यातून भक्त गण देवीच्या दर्शनाला येत असतात.

चैत्र महिन्यामध्ये श्री एकवीरा देवीचा मोठ्या प्रमाणात उत्सव असतो. सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री 7 वाजता मोठी पालखी मिरवणूक काढली जाते. मंदिरापासून ते संपूर्ण कोळीवाडा येथे फिरविली जाते. पुढे उंबर देव मंदिरापर्यंत पालखी नेऊन परत ती देवीच्या देवळात आणली जाते. पालखीत गुलाल उधळीत कोळीबांधव आनंदाने उत्सव साजरा करतात. नवरात्रोत्सवानिमित्त रविवार (दि. 29) ते मंगळवार (दि. 8 ऑक्टोबर)पर्यंत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मोरा ग्रामस्थ व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले. मंगळवार (दि. 8) सकाळी 9 ते 11 हवन, होम, सकाळी 11 ते 12 वा हरिपाठ भजन (आदिनाथ भजन मंडळी मोरा -कोळीवाडा. दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन श्री एकवीरा देवी सामाजिक विकास संस्था मोरा कोळीवाडा असून, सालाबादप्रमाणे आयोजन केले जाते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply