Breaking News

भिलवले पूल धोकायदायक

खोपोली : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे भिलवले-वावंढळ रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या पुलाला धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उंचीने कमी असलेल्या या पुलावरून पाणी जात होते. वाहून आलेल्या कचर्‍याचे साम्राज्य या पुलावर तयार झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यात हा पूल उभा असून पुलाचे कठडे दिसत नाहीत. शिवाय रस्ता व पुलाच्या कडेला खचला असल्याने नवख्या वाहनचालकाच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे अपघात घडला तर जबाबदारी कुणाची, असा प्रश्न पडला आहे. याच पुलावरून दळणवळण सुरु आहे. असंख्य वहाने रोज या रस्त्यावरून जा-ये करीत असतात. अनेक सेलिब्रेटी यांचे फार्महाऊस या भागात आहेत. भिलवले धरणावर मौजमजा करणारे याच रस्त्याचा वापर करतात.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply