Breaking News

झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत भारताची विजयी आघाडी

हरारे : वृत्तसंस्था
भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान पाच फलंदाजांच्या मोबदल्यात पार करीत दुसरा वनडे सामना पाच विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था चार बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती, मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने प्रत्येकी 33 धावा केल्या, तर शार्दुल ठाकूरने 38 धावा देत तीन बळी घेतले. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना 22 ऑगस्टला होणार आहे.
झिम्बाब्वेचे 162 धावांचे आव्हान पार करताना सुरुवातीला भारताची टॉप ऑर्डर ढेपाळली होती. सलामीला आलेला कर्णधार केएल राहुल (6) दुसर्‍याच षटकात बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील स्टार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दुसर्‍या विकेटसाठी 42 भागीदारी रचली मात्र शिखर धवन 33 धावा करून माघारी गेला. भारताचा धडाकेबाज सलामीवीर इशान किशन झिम्बॉब्वे विरूद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करण्यास आला, मात्र तो फक्त सहा धावांची भर घालून माघारी परतला. त्याला जाँगवेने बाद केले. त्यानंतर शुभमन गिल देखील 33 धावांवर बाद झाला. या दोघांनीही लुक लाँगवेने बाद केले.
यानंतर संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. संजू सॅमसनने नाबाद धावा केल्या तर दीपक हुड्डाने 25 धावा केल्या. या दोघांनी भारताला विजयाच्या समिप पोहचवले. त्यानंतर संजू सॅसमन आणि अक्षर पटेल यांनी विजयाची औपचारिकता 26 षटकात पार पाडली. संजू सॅमसनने नाबाद 39 धावा केल्या.
तत्पूर्वी, दुसर्‍या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 38.1 षटकात 161 धावात गुंडाळले. शार्दुल ठाकूरने भेदक मारा करीत तीन विकेट्स घेतल्या. तर झिम्बाब्वेने सेन विलियम्सने 42 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रेयान ब्लरने 39 धावा करून चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेचा डाव 161 धावात संपुष्टात आणला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 38 धावा देत तीन तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. झिम्बॉब्वेचे शेवटचे दोन फलंदाज धावबाद झाले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply