पनवेल ः रामप्रहर वृत्त
रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयातील प्रणय टोपले याने सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रणयने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रशिया येथील अनपा शहरात 24 ते 29 सप्टेंबरदरम्यान झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड कप किक बॉक्सिंगमध्ये प्रणय टोपले याने सुवर्णपदक मिळवले आहे. पनवेल तालुक्यातील शिवकर येथे राहणारा प्रणय युनायटेड शोतोकॉन कराटे या असोसिएशनमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे. या अगोदरही प्रणय टोपले याने चमकदार कामगिरी केली असून, आतापर्यंत त्याने 25 गोल्ड मेडल मिळविले आहेत. याआधी गोवा, भुटान, नेपाल, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कोलकता या ठिकाणी त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी संतोष म्हात्रे, मंदार पनवेलकर, प्रशांत गांगर्डे, निखिल मते या सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य, डॉ. एस. के. पाटील, फिजीकल डायरेक्टर प्रा. व्ही. बी. नाईक, जिमखाना चेअरमन डॉ. परमार, क्रीडा शिक्षक डॉ. चौगुले आदी उपस्थित होते.