मुंबई : एमपीएससी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बुधवारी (दि. 10) घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात अनेक विद्यार्थ्याची दोन वर्ष वयोमर्यादा वाढवा किंवा संधी द्या, अशी मागणी होती. त्यानुसार बुधवारी मंत्रिमडंळात चर्चा झाली. इथून पुढे होणार्या एमपीएससी परीक्षेत ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्या सर्वांसाठी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …