Breaking News

म्हसळा तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना अनुदान मंजूर

म्हसळा : प्रतिनिधी

तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी 15 लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, सदस्य प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, यशवंत आवेरे, गटविकास अधिकार्‍यांचे प्रतिनिधी चौधरी, नायब तहसीलदार के. टी. भिंगारे, अव्वल कारकून विशाल भालेकर, गोविंदराव चाटे, सरिता निमकर, नुतन गोविलकर आदी उपस्थित होते. या बैठकीत संजय गांधी अपंग योजनेचे 4 लाभार्थी (प्रतिमहा रु. 800), संजय गांधी विधवा योजनेचे 2 लाभार्थी ( प्रतिमहा रु. 600), इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना 4 लाभार्थी (प्रतिमहा रु 600), श्रावणबाळ योजनेचे 5 लाभार्थी (प्रतिमहा रु 600) यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती विशाल भालेकर यांनी दिली.

मंजूर झालेले लाभार्थी

संजय गांधी अपंग योजना : पुष्पा नारायण सुभेदार (खरसई), अफ्रा अब्दुल वहिद काजी (म्हसळा), उत्तम भिकुराम शिंदे (पाष्टी) आणि सुरेखा शांताराम साळुंखे

संजय गांधी विधवा योजना : पार्वती नथुराम नाक्ती (काळसुरी) आणि जयवंती गणपत पेंढारी (सोनघर)

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना : पार्वती हिराजी चाळके  (काळसुरी), सरिता नथुराम धोंडगे (संदेरी), सुरेखा बाबू फणसे (चिखलप) आणि देवकी चंदर घोसाळकर (काळसुरी)

श्रावणबाळ योजना : आनंदी गोविंद चिबडे (संदेरी), काशीबाई रामभाऊ वारगे (काळसुरी), भीमा गंगाराम भेकरे (भेकर्‍याचा कोंड), लक्ष्मी गोविंद डावरूंग (संदेरी) आणि रमाबाई महादेव शिगवण (संदेरी)

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply