Breaking News

गव्हाण विद्यालयात गरबा नृत्याविष्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त विविध कार्यक्रम होत असून, संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास गरबा नृत्याविष्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींनी दांडिया नृत्य अर्थात गरबा नृत्याविष्कार करून आनंदोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवात सर्व रयतसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संगीताच्या तालावर लालित्यपूर्ण पदन्यासासह सर्वोत्तम सादरीकरण केल्याबद्दल ललिता व अनिता पुरोहित या इयत्ता नववी ब या वर्गातील विद्यार्थिनींचा लेखणी प्रदान करून सन्मान करण्यात आला, तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमांत राबविलेल्या विविध उपक्रमांत सादर झालेल्या पथनाट्यापैकी इयत्ता दहावी ब या गुरुकुल वर्गाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या लोकजागृती पथनाट्य संहिता लेखनाबद्दल ऋतुजा रंधवे या विद्यार्थिनीस गौवरण्यात आले. या वेळी उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग प्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुलप्रमुख संदीप भोईर आणि सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply