मोहोपाडा ः वार्ताहर
जिल्हास्तरीय स्केटिंग प्रतियोगिता 2019चे आयोजन याक पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. यामध्ये श्री स्वामी-नारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा गटातून आपापल्या नैपुण्याचे प्रदर्शन केले.
ही स्केटिंग स्पर्धा 11 वर्षे, 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटाखालील विद्यार्थ्यांसाठी क्वाड स्केटिंग व इनलाईन स्केटिंग या प्रकारात घेण्यात आली. यामध्ये इनलाइन स्केटिंग प्रकारात गीतेश सावंत (11 वर्षाखालील), नावीन्य पवार (17 वर्षाखालील) यांनी प्रथम स्थान तर युग बोरोले (11 वर्षाखालील), देव पटेल (14 वर्षाखालील), राहुल जोशी (17 वर्षाखालील) यांनी तृतीय स्थान पटकावले.
याशिवाय क्वाड स्केटिंग प्रकारात शैल सणस (17 वर्षाखालील) याने प्रथम स्थान, तर ध्यान चोपडा (11 वर्षाखालील), नियम विराणी (17 वर्षाखालील) यांनी द्वितीय स्थान आणि आदित्य मिरकुटे (14 वर्षाखालील) याने तृतीय स्थान पटकाविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक प. पू. योगेश्वर स्वरूपदास स्वामी, प. पू. आत्मस्वरूपदास स्वामी, तसेच प्राचार्य जॉन्सन व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन व कौतुक केले.