Breaking News

दसर्‍यानिमित्त नागपुरात संघाचे पथसंचलन

नागपूर : प्रतिनिधी

नागपूरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा मंगळवारी (दि. 8) प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त स्वयंसेवकांनी पथसंचलन केले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंगदेखील उपस्थित होते.

या वेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारची प्रशंसा केली. ते म्हणाले, सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून सरकारने कटिबद्धता दाखवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच सत्तेतील प्रत्येकाचे स्वागत व्हायला हवे. हिंदूंची गोष्ट करणे म्हणजे मुस्लिमांना विरोध करणे होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांचाही सहभाग आवश्यक -शिव नाडर

सक्षम नागरिकांमुळेच आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकलो, तसेच केवळ सरकार सामाजिक समस्यांवर मात करू शकत नाही. त्यासाठी सरकारसोबत खासगी संस्था, एनजीओ, नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे, असे मत शिव नाडर यांनी व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply