Breaking News

पेणमध्ये वीज बिल थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू

पेण ः प्रतिनिधी

वीज बिल वसुली मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने पेण तालुक्यासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांस दिलेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून महावितरणच्या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. वीज बिल न भरणार्‍या पेण मंडळातील लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती तसेच सार्वजनिक विभागाकडे बीज बिलाची लाखोंची थकबाकी आहे. कोरोनातील थकबाकीमुळे हा आकडा वाढला असून वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 1 ते 9 फेब्रुवारीदरम्यान 3.47 कोटींचीथकबाकी असणार्‍या तब्बल चार हजार 922 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महावितरणच्या भांडूप परिमंडळातील पेण मंडळात 53,960 लघुदाब घरगुती ग्राहकांनी वीज बिलापोटी 3623.93, 6269 लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी 986.41, तर 401 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी 121.02 लाख रुपये असे एकूण 60,662 ग्राहकांनी 4,731 लाख रुपये थकविले आहेत, तसेच 1685 सार्वजनिक संस्थांनी 144.56 लाख रुपये थकविले आहेत. 1685 सार्वजनिक संस्थांनी 144.56 लाख, महावितरणच्या भांडूप परिमंडळातील ठाणे मंडळात 34,806 लघुदाब घरगुती ग्राहकांनी 330.15 लाख, 6,914 लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी 1205.74 लाख, 493 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी 153.86 लाख रुपये असे एकूण 42,213 ग्राहकांनी 4709.75 लाख रुपये थकविले आहेत. 

त्याचप्रमाणे वाशी मंडळात 46,705 लघुदाब घरगुती ग्राहकांनी वीज बिलापोटी 5234.40 लाख, 11,642 लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांनी 2291.98 लाख, 452 लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी 290.17 लाख असे एकूण 58,799 ग्राहकांनी 7,815 लाख रुपये थकविले आहेत. सार्वजनिक संस्थांनी 98.78 लाख रुपये थकविले आहेत. याबाबत ग्राहकांकडे अनेक वेळा पाठपुरावा केला असून शेवटचा पर्याय म्हणून 1 फेब्रुवारीपासून अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ज्यांनी 1 एप्रिलपासून एकही वीज देयक भरले नाही त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांत कारवाई करून अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply