Breaking News

महिलांचा सन्मान करा, देशाची संपत्ती वाचवा : मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा. देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) दसर्‍याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 107 फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. पुतळा दहन करण्याआधी मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.

आईची उपासना शक्तीची साधना करणारा आपला देश आहे. त्यामुळे प्रत्येक आईचा, मुलीचा सन्मान, गौरव आणि तिची प्रतिष्ठा जपण्याचे, तिचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करणे ही आपली जबाबदारी आहे. दिवाळीत आपण लक्ष्मीची पूजा करतो. प्रत्येक घरात, गावात, शहरात मुलीच्या रूपात एक लक्ष्मी असते. म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात मुलीचा सन्मान करावा. तेच खरे आपले लक्ष्मीपूजन असायला हवे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply