Breaking News

भाजपमध्ये जोरात इनकमिंग

खांडसगाव, उमरोलीत राष्ट्रवादी, शेकापला खिंडार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच आहे. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील खांडसगावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तसेच पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सोमवारी जहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केेलेली विकासकामे आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक पक्षांतील पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील खांडसगावातील राष्ट्रवादीचे दशरथ पोसाटे, गमन ऐनकर, महादू ऐनकर, रामा पादीर, यशवंत हिंदोळा, महादू पादीर, काळू वाघ, नामदेव मेगांळ, नरेश पादीर, बुधाजी झुगरे, जगन पादीर, भगवान हिंदोळा, रमेश हिंदोळा, विठ्ठल लोभी, मनोहर मेगांळ, तसेच पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील शेतकरी कामगार पक्षाचे अशोक पाटील, संतोष पाटील यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते राजेश भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुकापूरमध्येही पक्षप्रवेश

नवीन पनवेल : सुकापूर येथील कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपत प्रवेश केला. माजी उपसरपंच दत्तात्रय भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य बुवाशेठ भगत, माजी सदस्या भारती भगत, हनुमंत खुटले, मेनका खुटले, दीपक भगत, दिवेश भगत, शामली भागत, राहुल पवार, बळीराम भगत, सोनू चव्हाण, राम वाघ, अश्विनी वाघ यांनी प्रवेशकेला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply