कर्जतमध्ये निषेध आंदोलन
कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा मिळूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. राज्य सरकारने भ्रष्ट व मनमानी गृहमंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 21) भारतीय जनता पक्षाने कर्जत येथे निषेध आंदोलन केले. राज्य सरकारने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 10 वाजता टिळक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, किसान मोर्चा कोकण विभाग संयोजक सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिंनगरे, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, जिल्हा उद्योग आघाडी संयोजक मंदार मेहंदळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून निषेध करण्यात आला. या वेळी सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक सूर्यकांत गुप्ता, कोकण सोशल महिला प्रमुख गायत्री परांजपे, तालुका संयोजक पंढरीनाथ हजारे व सहसंयोजक मिलिंद खंडागळे, प्रज्ञा प्रकोष्ठ तालुका संयोजक समीर सोहनी, अभिनय खांगटे, मारुती जगताप, स्वप्ना सोहोनी, मनीषा अथनिकर, राजेंद्र जाधव, विजय जिनगिरे, विजय कुलकर्णी, वसंत महाडिक, नवीन देशमुख, संदीप म्हसकर, दशरथ पोसाटे, प्रवीण दळवी, सर्वेश गोगटे, बिलाल आढाळ आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपोलीतही भाजपचे आंदोलन
खोपोली ः प्रतिनिधी
आघाडी सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचे ताबडतोब निलंबन करा, या मागणीसाठी खोपोली मंडल भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीमध्येही दीपक हॉटेल चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी खोपोली भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ तावडे, सुनील भालेराव, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, प्रमोद पिंगळे, वामनराव दिघे, दिलीप निंबाळकर, जिल्हा कामगार आघाडी सदस्य सूर्यकांत देशमुख, चिटणीस स्वाती बिवरे, गोपाळ बावस्कर, सुमिता महर्षी, स्नेहल सावंत, संजय म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला आघाडी अध्यक्ष शोभाताई काटे, हिंमत मोरे, सागर काटे आदी उपस्थित होते.

RamPrahar – The Panvel Daily Paper