अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत पावसाने कधीही सरासरी चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला नव्हता. यंदा आतापर्यंत यावर्षी पाच हजार 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरी 160 टक्के पाऊस पडला आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा एक हजार 800 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 20 वर्षांतील जिल्ह्यात नोंदविलेले हे सर्वाधिक पर्जन्यमान आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी तीन हजार 142 मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पाच हजार 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण 160 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात आजवर नोंदविलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. जून महिन्यात जिल्ह्यात 605 मिलीमीटर, जुलैत एक हजार 876 मिमी, ऑगस्ट महिन्यात एक हजार 175 मिमी, तर सप्टेंबर महिन्यात एक हजार 305 मिमी पाऊस नोंदविला गेला. प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गेल्या 20 वर्षांत जिल्ह्यात पावसाने कधीही सरासरी चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला नव्हता. 2016मध्ये जिल्ह्यात 3930 मिमी, 2011मध्ये 3861 मिमी, 2005मध्ये 3853 मिमी पावसाची नोंद झाली होती. या तुलनेत यंदाच्या पावसाचे प्रमाण खूपच जास्त आहे. माथेरानमध्ये तर यंदा सात हजार 599 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग-3124 मिमी, पेण- 5689 मिमी, मुरूड-4344 मिमी, पनवेल-4621 मिमी, उरण- 3350 मिमी, कर्जत-5012 मिमी, खालापूर-5216 मिमी, माणगाव- 5523 मिमी, रोहा-5383 मिमी, सुधागड-5281 मिमी, तळा- 5964 मिमी, महाड-4293 मिमी, पोलादपूर -5802 मिमी, म्हसळा-4931 मिमी, श्रीवर्धन-4125 मिमी, माथेरान-7599 मिमी इतका पाऊस पडला आहे.
एकूण पाऊस : 80260 मिमी, सरासरी : 5016 मिमी, टक्केवारी : 160 टक्के