पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील नानोशी ग्रामपंचायत हद्दीतील गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
डॅशिंग नेते व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश पाटील, महेंद्र पाटील, उपसरपंच वैभव पाटील, वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, मच्छिंद्र काटेकर, सागर जोशी आदी उपस्थित होते.
गराडा येथील चंद्रकांत पारधी, नामदेव पारधी, महादेव पारधी, अविनाश पारधी, विजय पारधी, आनंद ठाकरे, अशोक दरवडा, राजू पारधी, मंगेश पारधी, पद्माकर पारधी, तसेच कामटवाडी येथील श्रावण वाघमारे, लहू वाघमारे, धाऊ वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, भुर्या वाघमारे, संकेत वाघमारे, सतीश वाघमारे, अंकुश वाघमारे, वत्सला वाघमारे, लिला वाघमारे, श्वेता वाघमारे, बेबी वाघमारे, द्वारका वाघमारे यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

पनवेल ः भारतीय जनता पक्षात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. त्याअंतर्गत पालेबुद्रुक येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्वागत केले. पालेबुद्रुक येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी शेकापचे संजय भगत, संजय पारधी, लहु पारधी, जोमा पारधी, मंगळ्या पारधी, बालू पारधी, संतोष भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
पालेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचाही भाजपत प्रवेश

उरण ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीत दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा ओढा वाढतच असून, उरण तालुक्यातील पाले गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.